Pradhan Mantri Awas Yojana : भारत सरकार ची प्रधान मंत्री आवास योजना (PMAY) हि एक घर घेणाऱ्यांसाठी प्रमुख योजना आहे. ज्याचा उद्देश नागरिकांना कमी किमतीत आणि पक्के घर देण्याचा आहे. हि योजना 25 जून 2015 रोजी सुरु झाली आहे ह्या योजनेला 2 भागात विभागले गेले आहे – प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) आणि प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण). ह्या ब्लॉग मध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत काय असणार आहे पात्रता आणि कश्या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
ह्या योजने अंतर्गत भारत सरकार ने 2022 पर्यंत सगळ्यांना पक्के घर मिळतील हे लक्ष्य ठेवले होते पण आता त्याची सीमा हि वाढवण्यात आली आहे ज्याणेंकरून अधिका अधिक नागरिकांना त्याचा लाभ हा घेता येईल. ह्या योजनेचा मुख्य उद्देश शहरी भागात आणि ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या कमकुवत (EWS), कमी उत्पन्न वर्ग (LIG) आणि माध्यम उत्पन्न वर्ग (MIG) ह्या नागरिकांना कमीत कमी किमतीत आणि पक्के घर देणे हा आहे.
त्याचप्राणाने हि योजना महिलां सोबत, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या धारकांसाठी प्रथम प्रधान्य देते.
Table of Contents
Pradhan Mantri Awas Yojana चे प्रकार
प्रधानमंत्री आवास योजनेला दोन भागेत विभागले गेले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – Pradhan Mantri Awas Yojana Urban
हि योजना शहरी भागात राहणाऱ्या कमी उत्पन्न आणि माध्यम उत्पन्न नागरिकांसाठी आणण्यात आली आहे. तसेच झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा विशेष लक्ष ह्या योजने अंतर्गत दिले जात आहेत. ज्याने करून पुर्नरविकास करण्यास त्यांना मदत होते
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – Pradhan Mantri Awas Yojana Village
ग्रामीण भागात कमी उत्पन्न नागरिकांना पक्के घर मिळण्यासाठी हि योजना राबवण्यात येत आहे. ह्याचा मुख्य उद्धेश हा ग्रामीण विकास आणि त्यांचे राहणीमान सुधारणे हे आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती
योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना |
कधी सुरु झाले | 25 जून 2015 |
लक्ष्य | 2022 पर्यंत कमी किमतीत आणि पक्के घर देणे |
प्रमुख लाभार्थी | EWS, LIG, MIG, महिला, SC / ST |
घरांच्या संख्यांचे लक्ष्य | 2 कोटी घरे |
घरांचे प्रकार | पक्के घरे |
संबंधित मंत्रालय | शहरी विभाग मंत्रालय आणि ग्रामीण विभाग मंत्रालय |
सबसिडीची टक्केवारी | 6.5% व्याज पर्यंत सबसिडी |
प्रधानमंत्री आवास योजने साठी पात्रता निकष ( Eligibility Criteria )
प्रधानमंत्री आवास योजने साठी तुम्ही पात्रता आहात कि नाही हे खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारावर कोणत्याही घराचे मालकी हक्क नसावे
- वार्षिक उत्पन्न
- EWS – 3 लाख पर्यंत असावे
- LIG – 3 लाख पासून ते 6 लाख पर्यंत असावे
- MIG-I – 6 लाख पासून ते 12 लाख पर्यंत असावे
- MIG-II – 12 लाख पासून ते 18 लाख पर्यंत असावे
- घरातील महिलेला मालक किंवा सहमालक असणे बंधनकारक आहे
- अर्जदारावर कोणतेही होम लोन चालू नसावे
- आधारकार्ड बंधनकारक आहे
प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा (Benefits of PMAY)
ह्या योजने अंतर्गत तुम्हाला अधिक लाभ हे दिले जातात.
- व्याज :- सबसिडी होम लोन वर ६.५% पर्यंत व्याज सबसिडी मिळते
- कर :- लाभ होम लोण वर कर लाभ मिळते
- पक्के घर :- सर्व पात्र असलेल्यांना पर्यावरणाला हानी न पोहचवता पक्के घर बांधून मिळते
- महिलांची हक्क :- घरातील महिलेला मालक किंवा सहमालक असणे बंधनकाराक आहे
प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य उद्देश
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत काही मुख्य उद्देश करण्यात येत आहेत.
सगळ्यांसाठी घरे | भारतीय नागरिकांना पक्के आणि कमी किमतीत घर देणे |
आर्थिक मदत | होम लोन वर सबसिडी |
महिलांसाठी | महिलांना घराचे मालक किंवा सहमालक होणे बंधनकारक आहे |
समाज | अनुसूचित जाती / जमाती आणि झोपडपट्टी मध्ये राहणार्यांना नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येते |
पर्यावरण अनुसार | पर्यावरणाला हानी न पोहचवता पक्के घर बांधने |
अर्ज कसे करावे (How to Apply for PMAY)
प्रधानमंत्री आवास योजने साठी अर्ज करणे अतिशय सोप्पे आहे. ह्या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज कसे करायचे
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिसिअल वेबसाईट वर जायचे (https://pmaymis.gov.in/)
- “Citizen Assessment“ वर क्लिक करायचे.
- आधार नंबर टाका आणि फॉर्म भरा.
- आवश्यक असलॆलॆ कागदपत्रे जोडा.
- फॉर्म पूर्ण भरा आणि अर्ज नंबर जपून ठेवा.
ऑफलाईन अर्ज कसे करावे
- जवळच्या सर्व्हिस सेंटर ला जायचे.
- 25 रुपये अर्ज शुल्क देऊन फॉर्म भरा.
- आवश्यक असलॆलॆ कागदपत्रे जोडा.
आवश्यक असलॆलॆ कागदपत्रे कोणते? (Documents Required)
प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.
- ओळख पात्र – आधार कार्ड, वोटर आडी, ड्राइविंग लायसन्स इतर..
- पत्ता पुरावा – विजेचे बिल, राशन कार्ड, बँकेचे पासबुक इतर
- कर प्रमाण पत्र – सॅलरी स्लिप व इनकम टॅक्स रिटर्न फाईल पुरावा
- मालमत्तेची कागदपत्रे – विक्री करार पत्र किंवा इतर संबंधित कागदपत्रे.
प्रधानमंत्री आवास योजनेची प्रगती (Progress of PMAY)
ह्या योजने ने आतापर्यंत अधिकाधिक प्रगती केली आहे
- शहरी भागात 1.18 कोटी घरांना ह्याचा फायदा झाला आहे
- ग्रामीण भागात 2.14 कोटी घरांना ह्याचा फायदा झाला आहे
- 83 लाखांपेक्षा जास्त घरे हे ह्या योजने अंतर्गत बांधण्यात आले आहेत
राज्य नुसार सरासरी
राज्य घरे | मिळाल्याची सरासरी |
महाराष्ट्र | 13,64,923 |
आंध्र प्रदेश | 21,37,028 |
उत्तर प्रदेश | 17,76,823 |
गुजरात | 10,05,204 |
निष्कर्ष
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत भारत सरकार ने उत्तम प्रकारे काम करण्यात आले आहे. हि योजना गरिबांसाठी फक्त घरच नाही तर एक उत्तम राहण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन देणारी योजना ठरली आहे. तसेच महिलांसाठी सुद्धा ह्या योजनेमध्ये महत्वपूर्ण दर्जा देण्यात आला आहे.