Guru Nanak Jayanti Wishes in Marathi: दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरु नानक जयंती हि साजरी केली जाते. ह्या वर्षी हा दिवस 15 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. शीख धर्माची लोक हा दिवस खूप मोठा उत्सवात आणि थाटामाटात साजरा करतात. शीख धर्मात ह्या दिवशी अनेक कार्यक्रम तसेच कीर्तने आणि भोजन समारंभ सुद्धा आयोजित केले जातात. गुरु नानक हे शीख धर्माचे पहिले संस्थापक आणि प्रथम गुरु आहेत त्यांना नानक देव, बाबा नानक आणि नानक शाह अश्या नावाने सुद्धा ओळखले जाते. यावर्षी गुरु नानक जयंती ला 555 वर्ष पूर्ण होतील. नानक नामा ह्या नावाने लडाख आणि तिबेटच्या अनेक प्रदेशात त्यांना ओळखले जाते.
मनुष्याच्या जीवनाशी संबंधित गुरु नानकजींनी आपल्या कार्यातून खूप चांगल्या सवयी आपल्या गुरुजनांना शिकवल्या आहेत. गुरु नानक जयंतीच्या ह्या दिवशी अनेक शीख लोक त्याच्या जवळच्या गुरुद्वारा मध्ये सेवे साठी सुद्धा जातात. शिखांचे संस्थापक यांना एक ओंकारचा नारा दिला आहे. म्हणजेच काय तर देव हा सगळ्या जगात एकच आहे. यायचा अर्थ असा कि जगात एकाच सर्वोच शक्ती आहे आणि हेच शीख धर्माच्या मूलभत तत्वज्ञानाचे प्रतीक आहे.
गुरु नानक देव ह्यांना समाज कार्यात नेहमीच खूप रुची होती म्हणून त्यांनी आपलं स्वतःच बालपण हे धर्मासाठी आणि समाजकार्यामध्ये पूर्णपणे वेचून दिले. असे बोलले जाते कि त्यांना सांसारिक जीवनात मिळूच रस नव्हता त्यांनी ते सद्देव भक्ती आणि सत्संगात आपले मन रमवत असत. गुरु नानकजींनी आपला संसार सोडून तसेच स्वतःच परिवार सोडून पूर्ण भारत देशातच नव्हेत तर भारत बाहेर सुद्धा पावस करून त्यांनी आपल्या धार्मिक एकतेची शिकवण दिली.
आम्ही तुम्हाला ह्या दिवसाचा महत्व हे सांगितले तसेच गुरु नानक जयंती हा दिवस अजून उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्या साठी काही शुभेच्यांचा संग्रह हा खाली देत आहोत. ते आपल्या प्रियजनांना, मित्रपरिवारांना पाठवून त्यांचा आनंद द्विगुणित करा.
Table of Contents
Guru Nanak Jayanti Wishes in Marathi | गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा मराठी मध्ये
वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह। गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
इक ओंकार सतनाम करता पुरख
निर्मोह निरवैर अकाल मूरत…
गुरू नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !
शीख बांधवांचे गुरु, गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा !
जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा संदेश देणारे गुरु नानक देव
यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!
जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
सर्व शीख बांधवांना गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
तुमची जन्मोजन्मी साथ मिळो
सर्वांजवळ आनंदाची वार्ता असो
जीवनात कोणती अडचण आली तरी
नेहमी गुरु नानक देवाच आशीर्वाद लाभो
गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा
या जगाच्या मोह-मायेपासून लांब राहो
वाहे गुरुच्या कृपेने आनंदाचे क्षण लाभो, हीच प्रार्थना
गुरु नानक जयंती निमित्त सर्वांना भरपूर शुभेच्छा